नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या* *ओढणीने गळा आवळून केली हत्या*

46

*नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या*

*ओढणीने गळा आवळून केली हत्या*

नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या*  *ओढणीने गळा आवळून केली हत्या*
नागपुरातील गुमगाव शिवारात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या*
*ओढणीने गळा आवळून केली हत्या*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर (नागपूर) : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,सुखदेव देवाजी वरखडे, गुमगाव हा मासेमारी करण्यासाठी सोमवारी घरून निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. या संदर्भात पोलीस ठाण्यात सुखदेव बेपत्ता झाल्याची सूचना पोलिसांना देण्यात आली होती. सुखदेवचे नातेवाईक त्याचा हिंगणा परिसरात शोध घेत असताना बुधवारी सायंकाळी उशिरा वागधरा-गुमगाव येथील जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. लागलीच याची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. सुखदेवचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले होते. शिवाय त्याच्या गळ्याला सुद्धा ओढणी गुंडाळलेली होती, यावरून पोलिसांनी सुखदेवची हत्या गळा आवळून केली असावी असे सांगितले आहे.
सुखदेवच्या गळ्यात अडकलेल्या ओढणीचे एक टोक पंप हाऊसच्या इमारतीला असलेल्या लोखंडी रॉडला बांधलेले होते. सुखदेवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा देखावा आरोपींनी तयार केला होता. मात्र, ओढणी तुटल्याने मृतदेह खाली पडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.हत्येचा गुन्हा दाखल -सुखदेवच्या मृत्यू प्रकरणी हिंगणा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा खून प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय सुखदेवच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृतकाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीच्या भावासोबत सुखदेवचे भांडण झाल्याची माहिती समजली आहे. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.