बल्लारपूर वेकोली हत्या प्रकरण अवघ्या 2 दिवसात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
वेकोली येथील WCL कामगारांच्या हत्ये प्रकरणात 4 आरोपी अटकेत
प्रेम प्रेमप्रकरनातून हत्या झाल्याचा संशय

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
बल्लारपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,बल्लारपूर शहरात हत्याचे सत्र सुरूच असतांना गुरुवार दिनांक 29 जुलै 2021 ला सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान मारोती उर्फ विक्की शंकर काकडे वय – ३४ रा.कन्नमवार वॉर्ड बल्लारपूर व वेकोलीत कामगार असलेले यांची बल्लारपूर-सास्ती पुलावर हत्या झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली सदर घटनेचे वृत्त कळताच बल्लारपूर शहर पुन्हा एका हत्येने हादरले पोलिसांनी या प्रकरणात आपली तपासचक्र फिरवून अवघ्या 2 दिवसात या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. विशेष बाब म्हणजे सदर हत्या प्रकरण अवैध प्रेमसंबंधातून झाल्याची सूत्रांची माहिती आहे या प्रकरणात एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी नामे १) सौ. प्राजक्ता उर्फ राणी मारोती काकडे, वय-२५ मृतकाची पत्नी, रा.कन्नमवार वॉर्ड, बल्लारपूर, २)कांता देवानंद भसाखेत्रे वय-४१, मृतकाची सासू रा.पंचशील वॉर्ड घुटकाळा चंद्रपूर, ३) संजय मारोती टिकले वय-२५ रा.संजय मारोती टिकले वय-२५ वर्ष, व्यवसाय – ट्रकचालक रा.नकोडा घुग्घुस जि. चंद्रपूर (मुख्य आरोपी असून) ४) विकास भास्कर नगराळे वय-२३ व्यवसाय-मजुरी रा.नकोडा घुग्घुस जि. चंद्रपूर असे ४ आरोपींना काल रात्रीच्या सुमारास अटक केली आहे या संबंधातील अधिक माहितीनुसार मुख्य आरोपी व मृतकाची पत्नी यांचे अवैध प्रेमसंबंध असल्याची माहिती असून मुख्य आरोपी व त्याचा सहकारी यांनी बल्लारपूर येथे येवून दारू पिण्याच्या बहाण्याने त्यांना बाहेर घेऊन गेले व घुग्घुस नकोडा येथील एसीसी नाल्याच्या जवळ पाण्यात बुडवून व गळा घोटून हत्या केल्याची सूत्रांची माहीती आहे तसेच त्याठिकाणी हत्या करून त्यांचे प्रेत प्लास्टिक बोरी चारचाकी वाहनाने बल्लारपूर येथे आणून बल्लारपूर-सास्ती पुलावर टाकल्याचे वृत्त आहे मृतकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून हत्या केल्याचे बनावट चित्र निर्माण केले आहे.विशेष बाब म्हणजे सदर प्रकरण अवैध प्रेमसंबंध व वेकोली कामगारांच्या मृत्यूनंतर अनुकम्पा तत्वावर नौकरी हस्तगत करण्याच्या प्रयत्नातून सदर प्रकरण घडल्याचे वृत्त आहे या प्रकरणाचा पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, शलेंद्र ठाकरे सपोनि बल्लारपूर करीत असून सदर प्रकरणात या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात पेशी केल्याचे वृत्त आहे.