आई ही देवाची सावली, मुलाची माऊली असते.

49

आई ही देवाची सावली,
मुलाची माऊली असते.

आई ही देवाची सावली, मुलाची माऊली असते.
आई ही देवाची सावली, मुलाची माऊली असते.

आई ही देवाची सावली,
मुलाची माऊली असते.
वात्सल्याची शितल छाया,
ममतेसाठी झीजवुनी चंदनापरी काया,
अशी असते आईची प्रेमळ माया.

आई तुझ प्रेम सगळ्यावर सारखं ग.
तुझा वीणा रक्ताच्या नात्यात नाही अर्थ ग.
तु असतांना तुला जीव लावन अशक्य असत ग.
वेळ गेल्यावर ती सोबत असन शक्य नसत.

आई तुझ्या सहवासात सगळे आपले असतात.
श्वास थांबला की, आई सगळे आगळे वेगळे दिसते ग.
काय ग आई किर्ती तुझी समाजात.
तुझा वीणा आम्ही मुल झालो वात्सल्याने पोरकी.

काय ग आई या गर्दीत तुझा हात सुटला.
माझ्यावर असणारा तुझा आशिर्वादाचा हात मुकला.
आई तुझा कणानी आज ही मयुरी झाली.
तुझा बरोबर जिवन भराचे ऋणानुबंध जुडाले.

आई असन गरजेचं असतं
तिच्या वीणा जगन अपुरेस वाटत.
तू नसल्यावर तुझी यायची वाट असते.
मनात वेगवेगल्या विचाराची गुंता गुंती असते.
आई ही देवाची सावली, मुलाची माऊली असते.
आई ही देवाची सावली, मुलाची माऊली असते.

कवी- मयुरी टेंभरे, रामेश्वरी नागपुर