आमदार धोटे यांची तारसा खुर्दला भेट; आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे निर्देश* *मिडिया वार्ता न्युज च्या बातमी ची दखल घेऊन आ.सुभाषभाऊ धोटे यांची तारसा खूर्दला भेट*

47

*आमदार धोटे यांची तारसा खुर्दला भेट; आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे निर्देश*

*मिडिया वार्ता न्युज च्या बातमी ची दखल घेऊन आ.सुभाषभाऊ धोटे यांची तारसा खूर्दला भेट*

आमदार धोटे यांची तारसा खुर्दला भेट; आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे निर्देश* *मिडिया वार्ता न्युज च्या बातमी ची दखल घेऊन आ.सुभाषभाऊ धोटे यांची तारसा खूर्दला भेट*
आमदार धोटे यांची तारसा खुर्दला भेट; आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे निर्देश*
*मिडिया वार्ता न्युज च्या बातमी ची दखल घेऊन आ.सुभाषभाऊ धोटे यांची तारसा खूर्दला भेट*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी: -तारसा खुर्द गावात डेंगू सदृश साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.पंधरा दिवसात डेंग्यूच्या आजाराने तिघांचा जीव गेला.
बळी जाणाऱ्या पैकी एक तारसा बूज तर अन्य तारसा खुर्द येथील रहिवासी होते.गावातील स्थिती लक्षात येताच आमदार सूभाष धोटे यांनी गावाला भेट दिली.तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी त्वरीत प्रभावी उपाययोजना राबविण्याचा सूचना आरोग्य विभागाला आ.धोटे यांनी दिले.
गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज आणि खुर्द येथे तापाची साथ पसरली आहे.डेंग्यू सदृश आजाराने गावातील तिघांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. याप्रकाराची माहीती मिळताच आमदार सूभाष धोटे यांनी तारसा खुर्दला भेट दिली.स्थानिकांशी संवाद साधला.गावातील तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी त्वरीत प्रभावी उपाययोजना अमलात आणण्याचा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. याप्रसंगी गोंडपीपरीचे तहसीलदार के.डी मेश्राम,सवर्ग विकास अधिकारी बुलकुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभु येलेकर , सरपंच अजय भोयर, उपसरपंच माधुरी येलेकर, ग्रामपंचायत सदस्य ममता चौधरी, संध्या वासेकर, विभा चांदेकर, आशा चेंदे,शरद चोचले ,राकेश अलोने, निकेश बोरकुटे, नितीन धानोरकर उपस्थित होते