भोलासिंग राठोड यांना नागपूर प्रेस क्लब येथे भावपूर्ण श्रद्धांजली

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
नागपूर शहरातील जेष्ठ पत्रकार भोलासिंग राठोड यांचे कोरोना काळात निधन झाले.भोलासिंग राठोड सारखे अनेक पत्रकार जोखीम पत्करून शासकीय कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी वृत्तांत करण्यासाठी वावरत होते.भोलासिंग सुद्धा त्यापैकी एक धडपड करणारा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याचे सर्वांना स्मरण व्हावे या हेतूने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दि.१ सप्टेंबर दुपारी १ वाजता प्रेस क्लब सिव्हिल लाईन नागपूर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या वरिष्ठ पत्रकार प्रभाकर कोडबंत्तुनवार , मोहन कोठेकर,जोसेफ राव,रवींद्र यादव,महेश बोकडे,नाना गेडाम , नितीन गिरी,गजानन ढाकुलकर, दिपक रंगारी, देवेंद्र सिरसाट, रोशन कापसे सह अनेक जेष्ठ पत्रकार उपस्थित होते या वेळी भाला सिंग राठोड यांच्या परिवारातील सदस्यही या वेळी उपस्थित होते.
अनेकांनी भोलासिंग यांच्या पत्रकारीतेच्या कार्या बाबत प्रकाश टाकला स्व. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण योजने अंतर्गत आपत्कालीन पत्रकारांच्या मृत्यू संदर्भात आर्थिक सहायता योजने अंतर्गत त्याच्या परिवाराला या योजनेचा लाभ मिळावा त्या माध्यमातून भोलासिंग राठोड यांच्या परिवारालाही या योजनेचा लाभ मिळावा असे मनोगत जेष्ठ पत्रकार विनायक पुंड यांनी व्यक्त केले.यावेळी सर्व पत्रकार संघांनी या बाबतचा ठराव राज्य शासनाला पाठवावा अशी विनंती सुद्धा करण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन भोलासिंग राठोड यांचे जिवलग मित्र विनायक पुंड यांनी केले.मोठ्या संख्येने नागपूर शहरातील पत्रकार उपस्थित होते.