वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

49

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

समुद्रपूर,०१/०९/२१
तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गांवरील नंदोरी जवळील मेंढूला पाटीच्या काही अंतरावर आज मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर वनक्षेत्र अधिकारी विजय धात्रक यांना माहिती दिली.
दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनेचा पंचनामा केला.सदर मादी जातीचे बिबट अंदाजे ३ वर्षा चे असावे त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचे डोक्याला खोल, जबरदस्त मार लागला होता मेंदू रक्त येत होते वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर व विजय धात्रक यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता आजदा रोपवाटिकेत आणण्यात आले यावेळी पशु संवर्धन अधिकारी डॉ स्मिता मुडे, वनरक्षक योगेश पाटील , प्रशांत कोल्हे क्षेत्र सहाययक कोरा,बिटरक्षक सुरेखा तिजारे, वनरक्षक सोपान कामतवर, वाहन चालक अनिल जुमडे अशोक दांडेकर, ए व्ही कोटे, दिलीप देशमुख वनकर्मचारी उपस्थित होते सदर बिबट हा काही दिवस आगोदर नागरी लाडकी भागात असल्याची चर्चा होती तोच बिबट इकडे आला असावा असा अंदाज बांधला जात आहे पुढील तपास वन अधिकारी करीत आहे.