*भंगाराम तळोधी येथील व्यक्तीची विहिरीत पडून आत्महत्या*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी…भंगाराम तळोधी येथील व्यक्तीची विहिरीत पडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव सुधाकर मोंडी मित्थावार असे असून तो व्यक्ती भं. तळोधी येथील रहिवासी आहे. राजेश्वर बिरा येग्गेवार हे आपल्या शेतात कामाकरीता सकाळी गेले असता त्यांना आपल्या विहिरीमध्ये कुणी तरी मरण पावले असल्याचे कळले.
त्यांनी गावातील पोलिस पाटील यांना सांगून गोंडपिपरी पोलिस स्टेशन येथे कळविण्यात आले. गोंडपिपरी तालुक्याचे नवनीयुक्त पोलिस अधीक्षक जीवन राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलिस अधिकारी शामराव पुलगमकार साहेब हे पुढील तपास करीत आहेत