दत्तात्रय लेनगुरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ

दत्तात्रय लेनगुरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ

दत्तात्रय लेनगुरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ

✍🏻जितेंद्र नागदेवते✍🏻
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही: सिंदेवाही येथिल उपविभागीय ग्रामीण पाणीपुरवठा चे वरिष्ठ सहायक लिपीक दत्तात्रय लेनगुरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा मोठ्या हर्षोउल्लासात साजरा करण्यात आला.
सेवानिवृत्त निरोप समारंभ कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तितरे मॅडम उपविभागीय अभियंता कुलकर्णी साहेब. कक्ष अधिकारी मेश्राम सर शाखा अभियंता मेश्राम साहेब, विस्तार अधिकारी महाजनवार व सत्कारमूर्ती दत्तात्रय लेनगुरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सिंदेवाही येथील पंचायत समिती सभागृह पार पाडलेल्या सत्कार समारंभात शाखा अभियंता मेश्राम ह्यानी प्रास्ताविक भाषणात दत्तात्रय लेनगुरे यांनी शासकीय सेवेत उत्कृष्ट कामाचा लेखाजोखा मांडला. त्यांनी केलेल्या शासकीय कामाचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला. यावेळी उपविभागीय अभियंता कुलकर्णी साहेब कक्ष अधिकारी मेश्राम साहेब विस्तार अधिकारी महाजनवार यानी आप आपले मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्ष भाषणात गटविकास अधिकारी तितरे मॅडम यांनी एखाद्या शासकीय कर्मचारी ला सेवानिवृत्त होणे किती कष्टप्रद असते त्यानी ऐवढ्या वर्षेपर्यंत सेवा केली असते त्यामुळे ते खुप अवघड असते. असे सांगितले तसेच त्यांचे भावी आयुष्य सुखात समृद्धीत जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी सत्कारमूर्ती दताञय लेनगुरे याचा शाल श्रीफळ तसेच भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाले संचालन मनोज अलोणे यांनी केले यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच शासकीय कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here