गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आरोपींनी लढवली नवीन शक्कल

गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आरोपींनी लढवली नवीन शक्कल

गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आरोपींनी लढवली नवीन शक्कल

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ:- कर्जत तालुक्यातील कळंब येथील गावाच्या हद्दीत बोरगाव ते चिकनपाडासाळोख येथे जाणाऱ्या रस्त्यावरून गोवंशीय जनावरे यांना कोणत्याही वाहनाने न नेता पाई कत्तली साठी नेत असल्याचे बोरगाव कळंब येथील स्वयंसेवकाच्या निदर्शनास आले. त्यांनी विलंब न लावता नेरळ अंतर्गत असलेल्या पोलीस आउट चौकीचे पोलीस उप निरीक्षक वसावे यांना ही बाब सांगितली.

वसावे व पोलीस हवालदार गोरे घटना स्थळी घाव घेतली व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स. पो. निरीक्षक शिवाजी ढवळे यांना प्रोटोकॉल प्रमाणे सांगितले. तो पर्यंत आरोपी शगफ बुबेरे यांनी पळ काढला. ढवळे यांनी त्वरित एक टीम तयार करून सोबत पोलीस उप निरीक्षक श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार देवेंद्र शिनगारे, पोलीस नाईक कोंडार यांनी घटना स्थळी धाव घेऊन ५ गोवंशीय जनावरे नेणाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली.

पोलिसांना प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपी यांनी संगमात करून ५ गोवंशीय जनावरे कोणत्याही खरेदी केलेल्या पावत्या न ठेवता कोठून तरी चोरी करून त्यांची वैध्यकीय तपासणी न करता बेकायदेशीररीत्या स्वतःच्या फायद्या करीता चोरी करून कत्तलीसाठी पाई चालवीत घेऊन जातांना ची कबुली दिली. त्यातील आरोपी नावे १. शगफ बुबेरे २.अजय चंद्रकांत चवर वय २५ वर्षे ३. मनेश अशोक वाघ वय १९ वर्षे ४. अल्पवयीन वय १४ वर्षे, त्यातील शगफ बुबेरे फरार असून त्याचा शोध पोलीस वसावे करीत आहेत.

सदरील गुन्हा नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत १७९/२०२४ नुसार नोंद असून एकून एक लक्ष पाच हजार रुपयांचे गोवंशीय जनावरे नेरळ येथील गो-शाळेत सुखरूप सोडण्यात आले. दोन्ही आरोपींना मा. न्यायालयाने १ दिवसाचा रिमांड दिला आहे, तर अल्पवयीन मुलास नोटीस देण्यात आली आहे. शिवाजी ढवळे यांच्या वारंवार कारवाई मुळे गोवंशीय जनावरे कत्तली करणाऱ्याचे धाबे दणादले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here