पंचशील गोरेगाव विभाग वर्षावास मालिकेचे आठवे पुष्प आंबर्ले येथे संपन्न
बौद्ध धम्म म्हणजे विज्ञान या विषयावर
प्रवचनकार रूपेश गमरे यांचे प्रवचन
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रं ८४१ आणि पंचशील महिला सेवा संघ गोरेगाव विभाग यांचे संयुक्त विद्यमाने वर्षावास मालिकेचे आठवे प्रवचन मौजे आंबर्ले येथे ३० ऑगस्ट, २०२५ रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रमणी साळवी होते. संस्थेचे अध्यक्ष विकासदादा गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रमुख वक्ते रूपेश गमरे यांचे कौतुक करताना काही महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीचे अपघाती निधन झाले. परंतु तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या आयु. रूपेश गमरे यांनी दुःखाचे निवारण करून जीवनाचा मार्गक्रम करावा अशी आमची सर्वांची मैत्री भावना होती. आज ते प्रसंगाला सामोरे जात असताना धम्म प्रचारक करीत आहेत. त्यांच्या सोबत धम्म प्रचारक संदीप महाडिक आहेत. गोरेगाव विभागाची दोन रत्न आहेत. समाजाने त्यांना जपावं असे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन आदर्श बौद्ध विकास मंडळाने केले. अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सुनील शिंदे, प्रकाश शिंदे, धम्म प्रचारक संदीप महाडिक, सुधीर शिंदे, रवींद्र शिंदे, नामदेव शिंदे, अभिजित शिंदे, सुदेश शिंदे स्थानिक व मुंबई प्रदेश समितीचे पदाधिकारी व रमाई महिला मंडळ यांनी केले.
कै. दलीत मित्र चंद्रकांत अधिकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रूपेश गमरे यांनी आढावे पुष्प गुंफले. बौद्धधम्म सत्याचा स्वीकार करतो. काळानुरूप बदल स्वीकारले जातात. हे फक्त बौद्ध धम्मात आहे. इतर धर्मात बदल करता येत नाही. वक्ते म्हणतात, पूर्वी लोक पृथ्वी स्थिर आहे अस म्हणत होते. सूर्य उगवतो व मावळतो असे म्हणत.कालांतराने पृथ्वी स्वतः भोवती फिरते. चंद्र, सूर्य स्थिर आहे याचा शोध लागला. हा बदल विज्ञानवादी बौद्ध धम्म स्वीकारतो. ईश्वर दिसला तर आहे. दिसत नाही तर नाही. आत्मा दिसला तर आहे. दिसत नाही तर नाही. सुख आहे म्हणून दुःख आहे. दुःखाचे निवारण करता येत. वक्ते स्वतः विद्यानांचे शिक्षक असल्याने त्यांनी अनेक उदाहरण दिली. बौद्धधम्म वास्तववादी आहे.
माणसाची पाच इंद्रिय जाणतात ते सत्य आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा, शील, करुणेवर आधारित असलेला धम्म महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. जागतिक विद्वानाने २१ वर्ष जगातील इतर धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धम्म दिला. जगातील बहुसंख्य बलाढ्य देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्वागत करीत आहेत.
पंचशील महिला संघाच्या अध्यक्ष सुप्रिया साळवी, उपाध्यक्ष सुवर्णा हाटे, रेश्मा संदीप साळवी, विजया विकास गायकवाड,
पंचशीलचे कार्यकर्ते तुकाराम लोखंडे, मांगरूळ,शरद मोरे, संदेश मोरे, चिंतामण गायकवाड, विजय जाधव, रामदास जाधव, बळीराम हाटे वडगाव, हिरामण महाडिक, वडघर,सुरेश अहिरे देवळी, निलेश महाडिक उणेगाव, जनार्दन जाधव, निखिल लोखंडे, हरीभाऊ हाटे, विजय मोरे, सुरेश जाधव, श्रीकांत साळवी, उपस्थित होते.
संघाच्या कार्यकर्त्या राजश्री साळवी, योजना शिंदे, जयश्री सोनवणे, सुनंदा गंगाराम मोरे, अपर्णा लोखंडे, संजना गायकवाड, भारती साळवी, रोहित राजन लोखंडे, प्रिया लोखंडे, समीक्षा सचिन महाडिक, विद्या हिरामण महाडिक, आंबर्ले येथील नैना नरेश शिंदे, सविता सुरेश शिंदे, राजश्री मोरे, भारती मोरे वडघर, सुनंदा यशवंत लोखंडे, दीपाली दिलीप मोरे या महिला मोठ्या संखेने हजर होत्या.
आंबर्ले संघाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, आयु. संदीप साळवी, आयु. संदीप महाडिक, यांनी मनोगत व्यक्त केले. आयु. राजू मोरे, सर यांनी २२ प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर धम्मदान दिले.नेते वक्त्याने.संघाला दान केले. रमाई महिला मंडळ व युवा मंडळ, ग्रामस्थ यांनी भोजन दान देवूंन कार्यक्रमाची सांगता झाली.