हिंगणघाट जळीतकांडाची सुनावणी कोरोनामुळे रखडली.


प्रशांत जगताप विदर्भ ब्युरो चिप

हिंगणघाट:- देशात करोना वायरस महामारीमुळे सर्वत्र वाढत असलेल्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाल्याने हिंगणघाटच्या जळीतकांडाच्या सुनावणीबाबत सध्या जैसेथे पेडींग परिस्थिती दिसून येत आहे.
वर्धा जिल्हा शासकीय अधिवक्ता गिरीष तकवाले याबाबत म्हणाले, शासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हे प्रकरण हिंगणघाट ऐवजी वर्धा जिल्हा न्यायालयात चालवण्याची विनंती केली होती. त्या अर्जावर अद्याप काहीही निर्णय झाला नाही. यावर्षी ३ फेब्रुवारीला राज्यभर खळबळ उडवून देणारे हे प्रकरण घडले होते. हिंगणघाटच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत अंकिता या युवतीस हिंगणघाटच्या नंदोरी चौकात पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेने सर्वत्र संताप उडाला होता. महिला संघटनांनी निदर्शने करीत नाराजी नोंदवली. राज्यशासनाने तत्काळ दखल घेत उपचारासाठी सर्व तो खर्च देण्याची तयारी दर्शवतानाच मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांना नागपूरला पाठवले होते. मात्र उपचाराच्या आठ दिवसानंतर १० फेब्रुवारीला पहाटे अंकिताचे निधन झाले. याप्रकरणी आरोपी विक्की नगराळेला अटक करण्यात आली होती. तिच्याच गावातील असलेल्या विक्कीने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, म्हणून सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्याची मागणी शासनानेही तत्परतेने मान्य केली होती. प्राप्त माहितीनुसार, त्यांनीच वर्धा न्यायालयात कामकाज चालावे म्हणून अर्ज दिला. मात्र मार्च महिन्यापासून करोनाचे संकट आल्याने न्यायालयाच्या कामकाजावरही परिणाम झाला. अंकिता प्रकरणही त्यामुळेच थांबल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here