सावनेर तालुक्यात विजेचा लपंडाव कधीपर्यंत चालणार उघड्या डिपी देत आहे अपघातास निमंत्रण.

अनिल अडकिने
सावनेर तालुका प्रतिनिधी मो.नं-9822724136
सावनेर,1ऑक्टोंबर:- विजेच्या मेंटेनन्ससाठी शासनातर्फे भरगच्च निधी येत असून त्याच्या उपयोग विज वितरण महामंडळ कोणत्या कामासाठी वापर करतात याचा नागरिकांत संभ्रम आहे. करोडो रुपयाचा निधी शासनाकडून येतो विज खांबावर जर झाडे जर आली असेल तर त्याची कापुन ताराना मोकळीक करणे, इलेक्ट्रिक पोल वर झाडाची वेली गुंफली असेल तर की कापणे, जोराचा वारा आल्यास तार आणि झाडे एकामेकावर आदळणार नाही याची काळजी घेणे व वारंवार मेंटेनन्स करणे हे आहे.
आज सावनेर शहरात विज वितरण महामहामंडळाचा हलगर्जी कारभार बघायला मिळत आहे. त्यामूळे शहरात सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील रोडवरची व वस्तीमधील डीपी बहुतांशी उघड्याच असतात उघड्या डीपी मुळे त्याच्या आत मध्ये वेली गुंफल्याने डीपी शॉट करतात. बहुतांशी डीपी उघडाच असल्यामुळे त्यामुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काम झाल्यास डीपी बंद करणे अति आवश्यक बाब आहे. ही उघडी डीपी सावनेर येथील एसटी डेपोला लागून असलेल्या साई मंदिर रोडवरची आहे. ही मेंटेनन्सची प्रक्रिया पावसाळा लागण्याआधीच विज वितरण महामंडळाकडून व्हायला पाहिजे होती. जेणेकरून विजेचा लपंडाव थांबेल व नागरिकांना पूर्ण वेळ लाईन मिळेल त्रास होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. विज वितरण महामंडळाकडून सुरु असलेला हलगर्जी सुरु असुन त्यामूळे मोठ्या प्रमाणात जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. विज मेंटेनन्सचे कामे साप्ताहिक बंदच्या दिवशीच काढावे. या गंभीर बाबीकडे शासनाने गांभीर्याने जाणीवपूर्वक लक्ष देऊन विज वितरण महामंडळाच्या कानात तेल टाकावे. अशी मागणी जनतेतून होत आहे.