हिंगणघाट येथील सुन्न करणारी घटना.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा ३०/०९/२१ अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून तिची हत्या करीत आईने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना हिंगणघाट येथील आशिष नगर विठ्ठल वॉर्ड परिसरात गुरुवारी दुपारी ३.३५ वाजताच्या सुमारास घडली असून सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने हिंगणघाट वासियांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून समाजमन सुन्न पडले. कविता मोहदुरे (३५) तर आराध्या मोहदुरे असे अडीच वर्षीय चिमुकलीचे नाव आहे.