हजारो हेक्टर सोयाबीन पाण्यात वार्षिक खर्चाचे अंदाज चुकले.

✍🏻 मीडिया वार्ता न्यूज ✍🏻
राम राठोड
तालुका प्रतिनिधी दिग्रस
9422160416
संपूर्ण वर्षभराच्या खर्चाचे अंदाज पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा मोसमी पावसाने चुराडा केला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीनचा पेरा पाण्यात गेला आहे. आधीच दराने तर आता पावसाने तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतलेली स्थिती दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली असून उभ्या सोयाबीनला कोंब फुटताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन काढणीच्या वेळी झाल्याने पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.आवक येण्याआधी सोयाबीनच्या दरात निम्म्याने घटले तर आता कसेबसे यातून सावरत आलेला सोयाबीन फंडातून बाहेर काढण्यासाठी लगबग चालू असताना मोसमी पावसाने नुकसान होते. त्यातच सोयाबीन वाळून खुळखुळा झालेल्या शेंगा पाण्यावर तरंगत आहे.नगदी पैसे देणाऱ्या पिकांची अशी दयनीय स्थिती झाल्याने जो शेतकऱ्यांनी वार्षिक खर्चाचा अंदाज बांधला होता. त्याचा चुराडा झाला आहे.
दिग्रस शहरासह हे पुराचे पाणी शेतात गेल्याने शेतातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेलीत, अनेकांच्या शेतात पाण्याचे डबके साचले. शेतातील कापूस,तूर,सोयाबीन ही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाआहे.
तालुक्यातील खंडापूर येथील गजानन राठोड यांच्या संपूर्ण शेतात पाण्याचे डपके निर्माण झाले आहे. व संपूर्ण शेतीत पाणीच पाणी झाले असून कापूस सोयाबीनसह शेतातील सर्व पिके चिखलात पडली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करून द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.