जैन ट्रस्टने केलेल्या जनसेवेबद्दल त्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक.

विशाल गांगुर्डे
प्रतिनिधी बदलापूर
ठाणे : श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप आशर कार्डीएक सेंटरच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून जैन ट्रस्टने या रुग्णालयाचा माध्यमातून केलेल्या जनसेवेबद्दल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.
*कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे ३५ हजार डोस*
दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील एका पडीक इमारतीच्या जागेवर ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या जितो रुग्णालयात आतापर्यंत ४७ हजार रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे ३५ हजार डोस देण्यात आले. तर कार्डीएक केंद्राच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
यावेळी या ट्रस्टला भरीव देणगी देणाऱ्या देणगीदार, ट्रस्टचे सदस्य, रुग्णालयात काम करणारे सर्व विभागातील डॉक्टर, परिचारिका, आया, वॉर्डबॉय आणि इतर सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा, ठाण्याचे खासदार राजन विचारे, बांधकाम व्यावसायिक आणि जितो ट्रस्टचे सर्वेसर्वा अजय आशर, पृथ्वीराज कोठारी, धर्मेश शहा आणि जितो ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, वर्गणीदार, रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका कर्मचारी हेदेखील उपस्थित होते.