महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल करीता निवेदन

✍साहिल महाजन✍
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836
प्रति,
अधीक्षक अभियंता सा. बां विभाग यवतमाळ. जि.यवतमाळ
यांचे सेवेशी,
विषय:-राळेगाव न.पं.मार्फत नागरी सुविधा योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे बाबत
महोदय,
उपरोक्त विषयान्वये सविनय निवेदन सादर करण्यात येते की राळेगाव नगर पंचायत मार्फत नागरी सुविधा योजनेअंतर्गत सन२०१८मध्ये उद्यान व सामाजिक सभागृहाचे काम करण्यात आले परंतु कामाचे टेंडर घेतलेल्या कंत्राटदाराने सर्व नियम व निकष धाब्यावर बसवुन या सभागृहाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे त्यामुळे या सभागृहाच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत तसेच या भिंतीमधुन झाडेझुडपे उगवली आहेत यावरूनच हे काम किती दर्जाहीन असेल याची प्रचिती येते . जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. या कामावर २४लक्ष रुपये खर्च करण्यात आले परंतु थातुरमातुर काम करून सदर निधी कंत्राटदार व आपल्या विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाचा निधीचा अपव्यय करून शासनाची लूट केली आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष देवुन या कामाची चौकशी करून यामध्ये दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करावी. त्यांच्याकडून सदर कामावर खर्च झालेला निधी वसुल करून दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. ही विनंती अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल करीता निवेदन सेवेशी सादर.
यावेळी मनसे यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, मनसे तालुकाध्यक्ष राळेगाव शंकर वरघट मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे उपस्थित होते
टिप:-सदर निवेदनावर आपल्या कडुन करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला येत्या आठ दिवसात लेखी स्वरूपात कळविण्यात यावा