नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात इल्लूर येथील इसम जागीच ठार गडचिरोली ब्रेकिंग

नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात इल्लूर येथील इसम जागीच ठार

गडचिरोली ब्रेकिंग

नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात इल्लूर येथील इसम जागीच ठार गडचिरोली ब्रेकिंग
नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात इल्लूर येथील इसम जागीच ठार
गडचिरोली ब्रेकिंग

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

आष्टी;-चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथे नरभक्षक बिबट्याने इसमावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
शंकर गंगाराम चिताडे वय 55 वर्ष रा. इल्लूर ता चामोर्शी जि. गडचिरोली असे बिबट्याचा हल्ल्यात ठार झालेल्या मृतक इसमाचे नाव आहे.
30 सप्टेंबरला सकाळी 11 च्या सुमारास मृतक इसम इल्लूर गावशेजारील जंगलात सरपणासाठी गेला होता.रात्र होऊनही सदर इसम घरी परत न आल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. दरम्यान आज सकाळच्या सुमारास बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून ठार केल्याचे उघडकीस आले.
सदर मृतक इसमाच्या मृतदेहाचे नरभक्षक बिबट्याने लचके तोडून झुडुपात नेऊन ठार केले.या परिसरात नरभक्षक बिबट्याच्या मानवी हल्ल्याचे प्रमाण कमी होत नसून जोपर्यंत युद्धपातळीवर वनविभागाने त्वरित त्याला जेरबंद करण्याची कार्यवाही न केल्यास मनुष्यहानी कमी होणार नाही हे निश्चित.