सापांसोबत स्टंटबाजी करुन सोशल मिडीयावर व्हायरल करणं आता पडणार महागात

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की सापांसोबत स्टंटबाजी करुन सोशल मिडीयावर व्हायरल करु नका. सापांसोबत स्टंटबाजी करुन सोशल मिडीयावर व्हायरलप्राण्यांशी खेळू नका असा संदेश वनविभागाकडून वारंवार दिला जातो. मात्र तरी देखील काही बहाद्दर ऐकण्यास तयार नसतात, अशांवर वनविभागाला माहिती मिळाल्यास कारवाई केली जातेअशीच एक घटना बेलतरोडी परिसरात उघडकीस आली.
सापाशी स्टंटबाजी करुन फोटो व्हायरल झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाने सौरभ नगर, बेलतरोडी येथील शरद चौधरी याच्या राहत्या घरी धाड टाकत त्याला ताब्यात घेतले. यादरम्यान वनकर्मचाèयांना त्याच्या घरी एक जीवंत कासव आढळून आले. हे शेड्यूल एक मधील कासव असून त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी हा सर्पमित्र असल्याचे सांगून वनविभागाला न कळविता स्वत:च अवैधरित्या साप पकडून त्यांना सोडून द्यायचा. सदर आरोपीला ३० सप्टेंबरला प्रथम श्रेणी, न्यायदंडाधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. न्यायालयाने जप्त कासव निसर्गमुक्त करण्याचे आदेश वनविभागास दिले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस वैरागडे हे पुढील तपास करीत असून उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा, सुरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही सुरु आहे. सर्पमित्र अथवा इतरांनीही वनविभागाला न कळविता साप qकवा इतर प्राणी पकडून त्याचा व्यापार व खेळ करु नका असे आवाहन वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.