कर्मचा-यांचे प्रश्न लवकरच निकाली काढणार प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांचे आत्मसन्मान विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचायांना सन्मानपूर्वक निरोप

कर्मचा-यांचे प्रश्न लवकरच निकाली काढणार प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांचे आत्मसन्मान विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचायांना सन्मानपूर्वक निरोप

कर्मचा-यांचे प्रश्न लवकरच निकाली काढणार
प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांचे आत्मसन्मान
विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचायांना सन्मानपूर्वक निरोप

कर्मचा-यांचे प्रश्न लवकरच निकाली काढणार प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांचे आत्मसन्मान विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचायांना सन्मानपूर्वक निरोप
✒️ देवेंद्र भगत ✒️
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मो.8275348920

अमरावती – (दि. 01.10.2023)
विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचे प्रश्न लवकरच निकाली काढणार असून याबाबत प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार योग्य कार्यवाही केल्या जाईल असे आ·सन प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी कर्मचा-यांना दिले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राधेशाम सिकची, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, नियंत्रण अधिकारी सौ. मोनाली तोटे पाटील, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. नितीन कोळी, श्री मंगेश वरखेडे, डॉ. एन.व्ही. फिरके, सत्कारमूर्ती उभयता डॉ. जी.एल. गुल्हाने व सौ. गुल्हाने, श्री पी.आर. गुल्हाने व सौ. गुल्हाने, श्री एम.ए. कवि·र व सौ. कवि·र, श्री बी.ए. राऊत व सौ. राऊत, श्री. व्ही.एस. लांजेवार व सौ. लांजेवार, श्री एस.टी. तराळे, श्री पी.आर. कोठार व सौ. कोठार, श्री एस.पी. तायडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
डॉ. प्रसाद वाडेगांवकर पुढे म्हणाले, विद्यापीठाच्या सेवेतून कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे पुढील जीवन सुखसमाधानी व आनंदमय व्हावे, यासाठी त्यांचे प्रश्न पेंशन लवकरच निकाली निघायला हवे. परंतु प्रक्रियेला वेळ लागत असल्याने प्रश्न निर्माण होतात. प्रक्रिया सुलभरितीने गतीमान करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केल्या जाईल व कर्मचा-यांना न्याय दिला जाईल. कर्मचा-यांनी आपल्या सेवाकाळात अतिशय उत्कृष्टरित्या सेवा दिली आहे व दिलेली कामे, जबाबदा-या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत सांगून त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुढील भविष्याच्या शुभकामना दिल्या.
प्रमुख अतिथी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राधेशाम सिकची म्हणाले, विद्यापीठातील कर्मचा-यांनी विद्यापीठाला चांगल्या प्रकारे सेवा दिल्या आहेत. कर्मचा-यांचे जे प्रश्न आहेत, ते सोडविल्या गेले पाहिजेत. प्रामाणिकपणे कर्मचा-यांनी काम केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांचे लाभ लवकरात लवकर मिळायला हवेत. यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाईल असे सांगून सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी डॉ.जी.एल. गुल्हाने, श्री. पी.आर. गुल्हाने, श्री एम.ए. कवि·र, श्री बी.ए. राऊत, श्री व्ही.एस.लांजेवार, श्री एस.टी. तराळे, श्री पी.आर. कोठार व श्री एस.पी. तायडे यांचा प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राधेशाम सिकची यांनी शाल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तर सौ. गुल्हाने, सौ. गुल्हाने, सौ. कवि·र यांचा सौ. प्रज्ञा बोंडे यांनी, सौ. राऊत, सौ. लांजेवार, सौ. कोठार यांचा साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सौ. तोटे, डॉ. चौखंडे, सौ. प्रज्ञा बोंडे व सौ. कु-हेकर यांनी सत्कार केला. त्याचप्रमाणे विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे व सचिव श्रीकांत तायडे यांनी पुस्तक, धनादेश देऊन सत्कारमूर्तींचा सत्कार केला.
यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून सेवाकाळातील आपले अनुभव, सहकारी कर्मचा-यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच नियंत्रण अधिकारी सौ. मोनाली तोटे पाटील, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. नितीन कोळी, श्री मंगेश वरखेडे, डॉ. एन.व्ही. फिरके, विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन सर्व सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुढील उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रगीत, विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी, तर आभार जनसंपर्क विभागातील श्री सुनिल महल्ले यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य मोठ संख्येने उपस्थित होते.