फणसापूर ते चौल-गायचोळे रस्ता तात्काळ करा

फणसापूर ते चौल-गायचोळे रस्ता तात्काळ करा

फणसापूर ते चौल-गायचोळे रस्ता तात्काळ करा
ॲड. राकेश पाटील यांचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना निवेदन

फणसापूर ते चौल-गायचोळे रस्ता तात्काळ करा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणारा अलिबाग तालुक्यातील मौजे फणसापूर येथून सुरू होणारा व चौल-गायचोळे येथे संपणारा अंदाजे ७ किलोमिटरचा रस्ता आहे. सदरच्या रस्त्यावर सुमारे २० वर्षापूर्वी डांबर पडली होती. त्यानंतर या रस्त्याला डांबरच माहिती नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. सदरच्या रस्त्याचे तात्काळ नुतनीकरण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी . भारत बास्टेवाड यांना निवेदन दिले आहे.

सदरच्या रस्त्याची अवस्था दयनिय झालेली आहे. हया रस्त्यावरून कुदे ,सुडकोळी , नवखार,भागवाडी, भोनंग, नवघर, महान, मोरोंडे , उमटे, रामराज, रामराज विभागातील ७ ते ८अदिवासी वाडया, बोरघर,ताजपूर, मोरखोल , भिलजी, फणसापूर ,बापळे , दिवी पारंगी , चिंचोटी, फुडेवाडी , चौल कातळपाडा ,वळवळी,वळवळी आदीवासीवाडी सुमारे 23 गावांतील नागरिकांचा रोजच्या रहदारीचा हा रस्ता असून वरील 23 गावांतील विदयार्थी विदयार्थीनी रेवदंडा काॅलेजला याच रस्त्याने जाणारे आहेत. चौल व रेवदंडा या ऐतिहासिक शहरांना जोडणारा कमी वेळ लागणारा रस्ता आहे. आग्राव कोळीवाडयातील कोळी महिला मासे विक्रीसाठी ग्रामिण भागात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र तो रस्ता ही शेवटच्या घटीका मोजता आहे.

सदरच्या रस्त्यावरून 23 गावांतील नागरीक हे ग्रामीण भागांतील असून हातावर पोट भरणारे आहेत. शेती आणि मासेमारी तसेच दुग्ध व्यवसाय करणारे
येथील नागरीक असून या विभागातील नागरिकांसाठी शेती, शिक्षणासाठी जवळची बाजारपेठ म्हणून चौल रेवदंडयाची बाजारपेठ आहे.

येथील 23 गावांतील लोक उदरनिर्वाहासाठी तसेच जे मोलमजुरी, मासेमारी, दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात ते या रस्त्यावरून जावूचशकत नाही ही वस्तुस्थिती आहे. पुर्वी हा रस्ता 20 मिटर रूंदीचा होता. आता रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यानी आपल्या हव्यासा मुळे कुंपणाचे मेढे वाढवून रस्ता जेमतेम 2 मिटरवर येवून अखेरची घटीका मोजत आहे.

सदरच्या रस्त्याला ऐतिहासिक महत्व आहे. इ.स.पुर्व चौलचे बंदर हे आंतरराष्ट्रीयबंदर होते त्यावेळी चौलच्या बंदरामध्ये परदेशात माल पाठविण्यासाठीही रोहयावरून आणलेला माल याच रस्त्यावरून ने आण केली जायची हे रायगडच्या गॅझेटचा अभ्यास केल्यानंतर समजते. या विभागातील 23 गावांतील नागरिकांना त्यांच्या शेती व शेतीपुरक व्यवसायांना गती देणारा हा एकमेव रस्ता आहे. सदरचा रस्ता नसल्यामुळे वाव्यावरून वळसा मारून जावे लागत असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा नाहक वाया जात आहे.

या 23 गावांतील लोकांची आर्थिक उलाढाल घडवून आणणारी चौलभोवाळे येथील श्री. दत्त ची यात्रा डिसेंबर मध्ये 5 दिवस भरते. या यात्रेमध्ये कोटयावधी रूपयांची उलाढाल होते. परंतु सदरचा रस्ताच नसलयामुळे येथील नागरीकांना त्याचा फायदा होत नाही. अनेक विदयार्थी रेवदंडा काॅलेजला जाण्यापासून वंचित राहत आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रूपोयांचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यासांठी खर्च केला जातो. मात्र वर नमुद रस्ता मागील वीस वर्षापासून डांबरींपासून वंचित आहे. आपणांस या 23 गावांच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांपुर्वी आपण या रस्त्याच्या कामास मंजुरी देवून 20 वर्षानंतर या रस्त्याला व येथील शे तकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थ्यांना मुक्ती दयावी या आषयाचे निवेदन अॅड. राकेष पाटील यांनी दिले.

फणसापूर ते चौल गायचोळे या रस्त्यावरून जवळजवळ 25 गांवातील काॅलेजला जाणारे विदयार्थी तसेच नागरीकांचा चौल रेवदंडा या बाजार पेठेंकडे जाण्याचा एकमेव रस्ता असून सदरच्या रस्त्यावर मागील वीस वर्षा पासून डांबरच पडलेली नाही. विकासाच्या फोका मारणऱ्या नेंत्यांनी तसेच रायगड जिल्हा परिषद प्रशासनांनी या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.
ॲड. राकेश पाटील सामाजिक कार्यकर्ते.