मोकाट गुरे ढोरे मालकांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आपली गुरे ताब्यात घ्या,

353
मोकाट गुरे ढोरे मालकांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आपली गुरे ताब्यात घ्या,

मोकाट गुरे ढोरे मालकांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आपली गुरे ताब्यात घ्या, अन्यथा गो शाळेत धाडली जातील:- पो. नि.नितीन मोहिते.

मोकाट गुरे ढोरे मालकांनी येत्या आठ ते दहा दिवसांत आपली गुरे ताब्यात घ्या,

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- कोलाड मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांचे कळप च्या कळप मध्यभागतील रस्त्यांवर तसेच मार्गाच्या कडेला थांड मांडून बसलेले असतात त्यामुळे काही जनावरे आपघाताला सामोरे जातात तर काही जनवरांच्यामुले आपघात घडून वाहन चालक व प्रवासी जखमी होतात त्यामुळे गेली अनेक दिवस येथील ग्रामस्थ नागरीक सदरच्या समस्येबाबत आक्रमक झाले होते तर या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ तसेच विविध सामजिक संघटना पत्रकार यांनी विभागीय पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांची भेट घेऊन साऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडत यावर उपाय योजना करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली याच अनुषंगाने विभागातील सर्व पोलिस पाटील, विद्यमान सरपंच यांना पाचारण करून या बाबतची माहिती ग्रामस्थांना मोकाट गुरे ढोरे कोणी रस्त्यावर सोडू नका जी मोकाट आहेत त्यांचा बंदोबस्त येत्या आठ ते दहा दिवसात संबधीत मालकांनी करावा अन्यथा गो शाळेत धाडली जातील अशी ठाम भूमिका पोलिस निरिक्षक नितीन मोहिते यांनी उपस्थित सरपंच आणि पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या समवेत घेतली आहे.

गेली अनेक दिवस मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर तसेच सुतारवाडी पहुर फाटा रोहा कोलाड रोड येथे मोकाट गुरे ढोरे रस्त्यावर येऊन आपघातास कारणीभूत ठरत आहेत तसेच त्यांच्या मुळे आपघात देखील घडत असल्याने या समस्येवर उपाय योजना म्हणून कोलाड पोलिस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी २९ सप्टेंबर रोजी कोलाड पोलिस ठाण्यात संबधीत सरपंच यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते बोलत होते.

यावेळी पोलीस निरिक्षक नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबले,दिलीप खांडेकर पहूर,सुरेश जाधव येरल,समीर महाबले संभे,बबन म्हसकर पुगाव,रविंद्र मरवडे तलवली तर्फे अष्टमी,तसेच सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे,शरद दिसले, प्रफुल बेटकर,संजय लोटणकर,दगडु बामुगडे,तुळशीराम शिंदे, गजनान सानप, प्रशांत दापके, महेन्द्र वाचकवडे,महेश स्वामी जंगम, श्रीकांत चव्हाण,संजय कामथेकर,शशिकांत मरवडे आदी सर्व सरपंच सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच प्राणी मित्र वृत प्रतिनिधी व डिजिटल मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सदरच्या मोकाट गुरे ढोरे यांचे मालक बे फिकीर असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा त्यामुळे वाढते आपघात होत असल्याचे उपस्थितांनी पुन्हा भडिमार केला तसेच महामार्गाचे काम सुरू असल्याने या मोकाट गुरांमुळे अधिक आपघात होत असल्याचे अनेकांनी सांगीतले यावर उपाय योजना म्हणून संबधीत गुरे ढोरे मालकांना आठ ते दहा दिवसांची सवलत दीले गेली आहे त्यामुळे जर का दिलेल्या कालावधीत सदरच्या मालकांनी ही उन्नाड मोकाट गुरे यांचा बंदोबस्त केला नाही तर पर्यायी स्थानिक रेस्क्यू टीम च्या मदतीने त्यांना पकडुन गो शाळेत धाडण्यात यावी असा सर्वानुमते ठरले आहे.