दोन कोटी रुपयांची लॉटरी; जिल्ह्यातील सतरा ग्रामपंचायत होणार चकाचक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दहा तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींना घंटागाडी देण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात केली गट विकास अधिकाऱ्यांना एक कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा निधी नुकताच वितरित करण्यात आला.
रायगड जिल्हा पर्यटना बरोबरच औद्योगीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. पर्यटन व औद्योगीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकल्प जिल्ह्यात होऊ घातले आहेत. जिल्ह्यामध्ये नागरिकीकरण देखील वाढू लागले आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील लोकवस्ती वाढत आहे.या स्थितीत शहरासह ग्रामीण भागातही कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
*तालुका निहाय आकडेवारी*
१. ग्रामपंचायत प्रत्येकी खालापूर, मसाला, माणगाव ,तळा ,पेण, कर्जत व श्रीवर्धन मधील
2. ग्रामपंचायत महाड मधील
3. ग्रामपंचायत अलिबाग व पनवेल तालुक्यातील.
*निधीचे वितरण*
संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमावर घंटागाडी खरेदी करण्यासाठी 2023 24 या आर्थिक वर्षात दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. घंटागाडी खरेदी करण्यासाठी 17 ग्रामपंचायतींना सात लाख पन्नास हजार रुपयांप्रमाणे एक कोटी 27 लाख 50 हजार रुपयांचा निधी देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना वितरित केला आहे.
“जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प घंटागाडी देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. यासाठी गटविकास अधिकाऱ्याकडे निधी वर्ग केला आहे.
*-राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग रायगड.*