मुंबईतील चाकरमान्यांचा रेल्वे गाडीत दसरा साजरा…

219

सन्मान तुमच्या सेवेचा, अभिमान आमच्या संस्कृतीचा

संजय पंडीत

ठाणे: सन्मान तुमच्या सेवेचा, अभिमान आमच्या संस्कृतीचा, या सुभाषिताप्रमाणे आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी कळवा कारशेड ६.५० लोकल ग्रुपच्या वतीने लोकल गाडीत दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी वर्षभर रेल्वे सेवा पुरविणाऱ्या सन्माननीय मोटरमन आणि ग्रुपचे सर्वांचे लाडके मित्र तथा लाईनमन श्री.शर्माजी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गाडीमध्ये जगदंबेच्या प्रतिमेची पूजा करून आरती करण्यात आली.तद्नंतर सर्वांना प्रसाद आणि नाश्ता वाटण्यात आला.

शेवटी गाडीतील ग्रुपमधील प्रवाशांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे अशी आंबेमाता चरणी प्रार्थना करण्यात आली.