स्विप्ट डिझायर गाडीचा अपघात, सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

54

स्विप्ट डिझायर गाडीचा अपघात, सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

विनायक सुर्वे प्रतिनिधी

मंगरुळपीर;- अकोला रोडवरील मंगरुळपीर शहरालगतच बालदेव या गावात MH-37,V9995 या क्रमाकांची स्विप्ट डिझायर गाडीचा अपघात होवुन यामध्ये महिलेला किरकोळ मार लागला असुन सुदैवाने जिवीतहानी झाली नाही माञ गाडीचे खुप नुकसान झाले.

अकोला महामार्गावरील मंगरुळपीर लगतच्या बालदेवला शेलुबाजार येथील बालाजी कृषी सेवा केंद्राच्या मांजरे नामक व्यक्तीची स्विप्ट डिझायर गाडी मंगरुळपीरवरुन शेलुबाजार येथे जात असतांना मध्येच एक मोटारसायकल आडवी आल्याने तिला चुकवत असतांना ताबा सुटुन हायवेवर बांधलेल्या नालीवर चढली.गाडिमध्ये असलेल्या दोघांपैकी एका महिलेच्या हाताला किरकोळ मार लागुन जखमी झाली.सिटबेल्टमुळे मोठा पुढील अनर्थ टळला असल्याचे समजते.या अपघातात एका सायकलचा चकनाचुर झाला.हा अपघात होताच तेथे ऊपस्थीत असलेले विकि श्रृंगारे,निलेश पंडीत,गजानन खरबडे,संदिप मोटे,सुनिल सावळे आदींनी तत्परने घटनास्थळी धाव घेवून गाडीतील दोघांना बाहेर काढले आणी पुढील ऊपचारासाठी दवाखान्यात पाठवले.