पुढिल निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मध्ये आघाडी होणार? असदुद्दीन ओवेसींनी यांचे संकेत.

41

प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
📲9766445348
मुंबई:- आरक्षणामुळे महाराष्ट्रात वातावरण तापल असताना आता मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा रॅली काढण्याची घोषणाही एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी ने केली आहे. त्यांच पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी ते वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडीचे संकेत दिले आहे.

2029 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनीअरींगचा वापर करत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षासोबत तसेच इतर छोट्या संघटनांसमवेत आघाडी करत राज्यातील भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांना विविध ठिकाणी तुल्यबळ लढत दिली होती. हाच पॅटर्न आता पुन्हा दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तसे संकेत दिले आहेत.

आंबेडकर-ओवेसी फॉर्म्युल्याचा सर्वात जास्त फटका राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 40 लाखाच्या वर मते मिळवत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ने मोठी राजकीय ताकद दाखवून दिली होती. मात्र अंतर्गत कलहामुळे ही युती 2019 च्या विधानसभेला कायम राहिली नाही. विधानसभेला वंचित आणि एमआयएम वेगळे लढले.