मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद-दिल्ली खेळ पुरस्कार

मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद-दिल्ली खेळ पुरस्कार सन्मानित मास्टर/सुरक्षा अधिकारी (सु. र म.) आकाश किशोर शिंदे यांना मा .केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांचा संविधान निवास्थान येथे पुष्प गुच्छ तसेच प्रशस्ति पत्र देवून सन्मानित करण्यात आले .
मास्टर आकाश शिंदे हे क्रीडा विभागात मार्शल आर्टस या शेत्रातून आज 14:वर्षा पासून मुंबई मधील विवध विभागात मोफत कराटे प्रक्षिशन देण्याचे सामाजिक कार्य करीत आहे व त्यानी सन 2018 रोजी अटल रत्न राष्ट्रीय खेळ पुरस्कार व 2019 रोजी भारतीय खेळ पुरस्कार नी सन्मानित करण्यात आले होते व त्यांचा या सामाजिक कार्य लक्षात घेता मेजर ध्यानचंद केंद्रीय परिषद येथून खेळ पुरस्कार करिता त्यांची निवड करण्यात आली होती व 29 ऑगस्ट 2021 रोजी खेळ दिवस निमित्त मास्टर आकाश शिंदे याना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते व त्याच आनंदात धारावी विधानसभा शेत्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)पदाधिकारी व कार्यकर्ते मा.सिद्धार्थ कासारे साहेब , मा.संमेक कासारे ,मा.जितु जाधव, मा.शरणप्पा बडसन, मा.अश्विन वाघ, मा.मल्लेश अर्जुन गडमिन, मा.नितेश विश्वकर्मा सहकारी मित्र गणेश, राजू यांचा सोबत मा. रामदास आठवले साहेब यांचा संविधान निवास स्थानी आठवले साहेब यांचा हस्ते पुष्प गुच्छ व शुभेच्छा पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
सदर सन्मानित कार्यक्रम दरम्यान मा. कमलेश वारिया सौराष्ट्र संपर्क प्रमुख – शिवसेना व ग्रँड मास्टर संदेश थिटे ही उपस्थित होते.