वेकोलि. चंद्रपूर क्षेत्राचे नवे एजीएम (क्षेत्रीय महाव्यवस्थापक) संजय वैरागडे • मोहम्मद शाबीर यांची उमरेडला बदली

46

वेकोलि. चंद्रपूर क्षेत्राचे नवे एजीएम (क्षेत्रीय महाव्यवस्थापक) संजय वैरागडे
• मोहम्मद शाबीर यांची उमरेडला बदली

वेकोलि. चंद्रपूर क्षेत्राचे नवे एजीएम (क्षेत्रीय महाव्यवस्थापक) संजय वैरागडे • मोहम्मद शाबीर यांची उमरेडला बदली

अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 31 ऑक्टोंबर

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या चंद्रपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक मोहम्मद शाबीर यांची उमरेड येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी वणी एरियाच्या ऑपरेशन विभागाचे महाव्यवस्थापक संजय वैरागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहम्मद शाबीर यांच्या बदलीचे आदेश शनिवारी काढण्यात आले. वेकोलिच्या उमरेड क्षेत्राचे महाव्यवस्थापक सेवानिवृत्त झाल्यानंतर तेथील जागा रिक्त होती. शाबीर यांची बदली करून त्यांना तातडीने उमरेड येथे रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. शाबीर यांना रविवारी कार्यमुक्त करण्यात आले. ते सोमवारी उमरेड येथे रूजू होणार आहेत. आता शाबीर यांच्या जागी वेकोलिच्या वणी क्षेत्राचे ऑपरेशन विभागाचे महाव्यवस्थापक संजय वैरागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेकोलित ऑपरेशन हा विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जोखीम पत्करणारा समजला जातो. या विभागाचा वैरागडे यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा कोळसा उत्पादनासाठी फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय वैरागडे हे मूळचे चंद्रपूर येथील आहेत. चंद्रपुरातील व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर नियुक्त होत असल्याने येथील वेकोली कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.