चिमूर येथे तलावात उडी घेवून इसमाची आत्महत्या

अश्विन गोडबोले

चिमूर,1 नोव्हेंबर: शंकरपूर येथून जवळच असलेल्या हिरापूर येथील एका व्यक्तीने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. उत्तम मुनघाटे (60) असे मृतकाचे नाव आहे. हिरापूर येथील उत्तम मुनघाटे हे आपल्या मुलांपासून मागील काही वर्षांपासून एकटेच राहत होते. शनिवारी ते घराबाहेर गेले. मात्र, परत आले नाही. हिरापूरवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव तलावात मृतदेह आढळल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. तलावातून मृतदेह बाहेर काढला. हातावर गोंदलेल्या नावामुळे उत्तम मुनघाटे यांची ओळख पटली. शंकरपूर पोलिसांनी मर्ग दाखल केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here