2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4, बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह , भोईवाडा येथे
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो: 7715918136
पनवेल: बौध्दजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेना प्रमुख सरसेनानी मान. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक – 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बौध्दजन पंचायत समिती व संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही बौध्द धर्मिय वधु वर परिचय मेळावा, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह , भोईवाडा, परळ, मुंबई – 400012 येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या हस्ते होणार असून उपसभापती विनोद मोरे व माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे हे उपस्थित विवाहोच्छुक तरुण तरुणी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश घाडगे करणार आहेत. तसेच विवाह मंडळ अध्यक्ष रामदास गमरे हे प्रास्ताविक सादर करणार असुन विवाह मंडळ चिटणीस गौतम जाधव आभार प्रदर्शन करणार आहेत. सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे , एच आर पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे , अंकुश सकपाळ खजिनदार नागसेन गमरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्याच अनुषंगाने आपल्या बौध्द समाजातील विवाहोच्छुक तरुण तरुणींनी आपल्या पालकांसह उपस्थित राहुन बौध्दजन पंचायत समितीच्या वधु वर परिचय मंडळाच्या प्रतिनिधींकडे नांव नोंदणी करावी. नविन सभासद शुल्क रु. पाचशे आकारण्यात येणार आहे. तरी समाजातील विवाहोच्छुक तरुण तरुणींनी या संधीचा लाभ घेण्यासाठी रविवार दिनांक – 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. अशी विनंती बौध्दजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात प्रसिध्द केली आहे.









