मुरुड येथील सर्व पक्षं स्वबळावर लढणार पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक ?

162

..परंतु नेत्याकडून महाविकास आघाडी महा युतीमध्ये लढण्याचा निर्धार

गोरे दत्ता

लातूर जिल्हा प्रतिनिधी

मुरुड; आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुड परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे लातूर ग्रामीण मधील शिवसेना उबाटा काँग्रेस भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील काही कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे स्थानिक पातळीवर मतभेद तिकीट वाटपातील असमाधान आणि स्थानिक नेतृत्वातील वाद या कारणांमुळे काही कार्यकर्त्यांनी स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे सर्वात पक्षाच्या अंतर्गत समीकरणांवर आणि निवडणुकीच्या निकालावर याचा नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

अनेक वर्षांपासून मुरुडमध्ये काँग्रेस शिवसेना उबाटा इतर पक्षाला सत्ता मिळालेली नाही त्यामुळे काँग्रेस प्रणीत लोकांनी पुन्हा एकदा गावातील राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत तथापि सत्य हे आहे की मागील काळात मुरुडमध्ये काँग्रेसचा उल्लेख केवळ नावापुरताच राहिला होता पक्षाचे खरे कट्टर कार्यकर्ते मात्र कधीच निवडून आले नव्हते आता आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या अंतर्गत मतभेद आणि स्थानिक समीकरणे पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहेत या परिस्थितीत सर्व पक्षातील वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात तसेच या हालचालींचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो याकडे मुरुडकरांचे लक्ष केंद्रीत झाले आहे मुरुडमध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व ठळकपणे दिसत होते त्यानंतर काही काळात भारतीय जनता पक्षाने आपले बळ निर्माण करून सत्ता हस्तगत केली या दोन्ही पक्षांच्या झुंजीत काँग्रेस पक्ष मात्र मागे पडत गेला असताना यामध्ये आता शिवसेना उबाटा गटाने हे जोर लावल्याचे चित्र दिसत आहे तरीही काँग्रेस पक्षातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर आपले पॅनल उभे करत लढण्याचे धाडस दाखवले जरी त्यांना विजय मिळाला नाही तरी त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली महाराष्ट्रात युतीच्या राजकारणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मित्र पक्षांना सहकार्य करण्याची भूमिका आजवर कायम ठेवली आहे मात्र स्थानिक स्तरावर पक्षाकडून हालचालींचा पूर्ण अभाव दिसून येतोय या निष्क्रियतेकडे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष न जाणे हे कटू वास्तव असून यावर निष्ठावान कार्यकर्त्याच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान मुरुडमध्ये निष्ठावंत सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची कमतरता भासत नाही का अशी चर्चा जनतेत रंगत आहे कारण राजकीय दबाव आणि स्थानिक समीकरणांमुळे सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार आजवर निवडून आलेला नाही स्थानिक लेवलला ग्राउंड लेव्हल ला काम करणारे कार्यकर्ते म्हणतात आमचं अस्तित्व फक्त मतदानापुरतं!

मुरुडमधील राजकीय पटावर एकेकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्राचे ग्रामविकास मंत्री कै विलासराव देशमुख साहेब दबदबा होता पण आज चित्र पूर्णपणे उलटं झालंय पक्षाचं नाव आहे पण कामात आणि प्रभावात अस्तित्व संपुष्टात आल्याचं वास्तव समोर येतंय पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे संकटातही झेंडा हातातून न सोडणारे कार्यकर्ते आज मान-अपमानाच्या उंबरठ्यावर उभे आहेत कुठल्याही कार्यक्रमात त्यांना मान नाही सन्मान नाही उलट उपयोग संपताच त्यांना दूर सारले जाते ही कटू पण खरी वस्तुस्थिती आहे पक्षातील नेतेमंडळी मात्र आपापल्या निकटवर्तीयांचीच भरती करून गटशाही बळकट करण्यात गुंग आहेत विचारधारेपेक्षा जवळीक महत्त्वाची झाल्याने पक्षाचे मूळ तत्त्वच हरवले आहे एका वरिष्ठ कार्यकर्त्याने माध्यमांशी बोलताना रोष व्यक्त केला अनेक वर्षांच्या राजकीय चित्रावर नजर टाकली असता मुरुड परिसरात राजकीय पक्षाची अवस्था शून्य झाल्याचे दिसून येते कार्यकर्त्यांना आज आदराचे स्थान मिळत नाही हे कटू सत्य कार्यकर्त्यांनाही मान्य करावे लागत आहे सर्वच पक्षांमध्ये आज आपल्या निकटवर्तीयांची भरती होत असून विचारधारेवर ठाम राहिलेले आणि पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे मुरुड शहरात अनेक वर्षे सक्रिय राहूनही या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही शहरातील कार्यक्रमांमध्ये त्यांना मान-सन्मान न देणे त्यांच्या उपयोगिता संपल्यानंतर दुर्लक्ष करणे या गोष्टींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे

त्यामुळे राजकीय पक्षांना अस्तित्व टिकवण्यासाठी निष्ठावंत चेक करत ही लागणार आहे कारण मतदार यादी मध्ये घोळ झाल्याचे वास्तव महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पुराव्या सहीत दाखवूनही निवडणूक आयोग गप्पा आहे त्यामुळे पूर्ण गोष्टीची माहिती असणारे निष्ठावंत कार्यकर्ते यांना मात्र आदराचं स्थान सर्वच राजकीय पक्षांना द्यावे लागणार हे मात्र तेवढेच महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून लातूर ग्रामीण मधील सर्वात मोठे शहर म्हणून चर्चेला जाणारे मुरुड या गावांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणूक मध्ये सहभागी करून घेणार का त्यांचा निवडणुकीपुरता वापर करणार हे मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नंतरच कळेल त्यामुळे ग्रामीण मध्ये बरेच महासत्ता असणाऱ्यांना फटका बसला असून याची खंत नेत्यांमध्ये असणारच परंतु निष्ठावंत यांचा मान सन्मान करून त्यांना चर्चेला बोलवून त्यांच्या नाराजी दूर करण्याची पक्षाकडून कितपत प्रयत्न होणार या निवडणूक महाविकास आघाडी का महायुती म्हणूनच लढवणार हे मात्र सर्वत्र चर्चेचा विषय आहे.