अहमदनगर भर रस्त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या, यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे वर धारदार शस्त्राने वार करून हत्या.

57

अहमदनगर भर रस्त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या, यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे वर धारदार शस्त्राने वार करून हत्या.

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ ता.पारनेर  सोमवारी ३० नोव्हेंरात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

जरे या सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने नगरकडे येत असताना जातेगाव फाटा नजिक मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडविले.यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या जरे यांना काही वेळातच नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर रात्री नगर- पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात दुचाकीवर आलेल्या दोघांनी खुनी हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने, असे सर्व जण मोटारीने पुण्याहून नगरकडे येत होते. शिरूरच्या पुढे निघाल्यावर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या मोटारीला कट मारला. नंतर मोटारीला ओव्हरटेक करीत पुढे जाऊन दुचाकी आडवी लावली. मोटार थांबल्यानंतर त्यांनी जरे पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. बाचाबाची सुरू असतानाच, एकाने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. विजयमाला माने यांनी स्वत: मोटार चालवित सुपे येथे आणले. तेथून जरे यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, हारून मुलाणी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेचा तपास सुरू केला.