नोकराचा मालकिणीवर बलात्कार, व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलही केले.

54

मुंबई नोकराचा मालकिणीवर बलात्कार, व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलही केले.

मुंबई:- मालकिणीवर बलात्कार करणे आणि व्हिडीओ बनवून त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका नोकराला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत असल्याचा धक्कादायक खुलासाही या प्रकरणात झाला आहे.

पीडिता ही घाटकोपर येथील व्यावसायिक कुटुंबातील आहे. या प्रकरणातील आरोपी तरुण मुंब्रा येथील रहिवासी असून तो 2019 मध्ये पीडितेच्या घरी नोकर म्हणून काम करू लागला होता. कामावर लागल्याच्या दोनच महिन्यांत आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडीओ बनवले.

त्या व्हिडीओच्या जोरावर तो तिला ब्लॅकमेल करू लागला. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीवर त्याने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार गेले अनेक महिने सुरू होता. दरम्यान त्याने तिच्याकडून पैसे आणि दागिनेही उकळायला सुरुवात केली.

महिलेने बदनामीच्या भीतीपोटी हे सगळं सहन केलं आणि त्याला तब्बल 1.20 लाख रुपये आणि आठ तोळे सोनंही दिलं. मात्र, त्याच्या वाढत्या मागण्या असह्य झाल्याने तिने नवऱ्याला सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांखाली त्याला मुंब्रा येथील घरातून अटक केली आहे.