आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.

53

आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.

सोलापूर:- आई वडिलांना ठार मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माढा तालुक्यातील आहेरराव येथे घडली आहे. याप्रकरणी योगेश पांडुरंग कदम वय- 25 रा. आहेरगांव ता. माढा जि. सोलापूर याच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. आरोपीला आज बार्शी येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

आरोपी योगेश कदम याची गेल्या दोन महिन्यांपूर्वी वरवडे येथील एका अल्पवयीन मुलीबरोबर ओळख झाली होती. त्याने आपला मोबाईल नंबर मुलीस दिला. पिडीत मुलीचे व त्याचे फोनवर बोलणे सुरू होते. दरम्यान रविवारी त्याने मुलीला दत्तात्रय गायकवाड यांच्या ज्वारीच्या शेतामध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी त्याने सुरुवातीला मुलीशी गोड बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी जवळ येऊ देत नसल्याचे लक्षात येताच त्याने तिला आईवडीलांना ठार मारण्याची देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याबाबत मुलीने आईवडीलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी योगेश कदमविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संबंधित युवकाविरोधात तक्रार दाखल केली. योगेश कदव वर भादवि कलम 376 (2) (n) posco 4,5(l),6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत.