धक्कादायक ! यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या….

55

धक्कादायक ! यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या….

हिरामण गोरेगांवकर..
अहमदनगर (01 डिसेम्बर 2020) : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या करण्यात आली आहे.
जरे या सोमवारी कामानिमित्त पुण्यामध्ये गेल्या होत्या. त्यानंतर पुण्याहून नगरकडे कार ने येत होत्या त्यावेळी जातेगाव फाट्याजवळ दोघा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांना अडविले त्यातील एकानी जरे यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.
यानंतर जरे यांना काहीवेळातच नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. हि सर्व घटना नगर – पुणे मार्गावर जातेगाव फाटाजवळ (ता. पारनेर )सोमवारी रात्री 8:00 वा घडली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सविस्तर माहिती घेतली. पोलीस निरीक्षक विशाल ढुमे यांनीहि जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचं सांगितले.