वरोरा आनंदवन महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटेची आत्महत्या.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटेची हत्या की आत्महत्या ये अजुन पर्यंत कळू शकले नाही.

प्रतीनिधी

वरोरा:- चंद्रपुर जिल्हातील वरोरा येथील ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे – करजगी वय 39 वर्ष यांनी केली आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. गंभीर स्थितीत त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, डॉ. शीतल आमटे

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांनी निर्माण केलेल्या सामाजिक कार्याच्या, कृष्ठरोग्याची सेवा करणाऱ्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.

काही दिवसांपूर्वी शीतल आमटे यांनी स्वतः च्या फेसबुक प्रोफाइल वर आमटे परिवारातील सदस्याबाबत बदनामीकारक पोस्ट टाकल्यानंतर काही वेळातच डिलिट करण्यात आली. विकास आमटे सुद्धा आनंदवन सोडून गेले असल्याने परिवारातील सदस्यांनी प्रेस नोट जारी करत शीतल आमटे याची मानसिक स्तिथी ठीक नसल्याचे भाष्य केले होते.

हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे. मृत शरीर चंद्रपूर येथे शविच्छेदनाकरिता पाठविण्यात येणार असून त्यानंतरच ही हत्या की आत्महत्या कळू शकेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here