चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रमत जाहिर

50

चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रमत जाहिर

चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रमत जाहिर
चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रमत जाहिर

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा, दि. १ डिसेंबर जिल्हयातील आष्टी, कारजा (घा), सेलू व समुद्रपूर या चार नगर वपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहेत.
या चारही नगर पंचायतीसाठी सुट्टीचे दिवस वगळून दि.1 ते 7 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात नामनिर्देशन पत्र दिले व स्विकारल्या जातील. दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी होईल.याच दिवशी छाननी नतंर वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांना दि.13 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. दि.14 डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या दरम्यान मतदान होईल व 22 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजल्या पासून संबंधित पंचायतीच्या सभागृहात मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.या चारही नगर पंचायतीसाठी निवडणूक व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याच्या नेमणूका सुध्दा करण्यात आल्या आहे.