चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक व बल्लारपूर सह अनेक तालुकाध्यक्षाची निवड

54

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी यांची आढावा बैठक व स्नेहमिलन सोहळा चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे हे होते विदर्भ उपाध्यक्ष प्रदीपजी रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते या सभेच्या सुरुवातीला कोरोनाच्या संक्रमण काळात आपला जीव गमावणारे पत्रकार संघाचे सदस्य गुरुदेव अलोने, आकाश भालेराव, भगवंत पोपटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोरोनाच्या संक्रमण काळात पत्रकारांच्या हितार्थ कार्य सुरू ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासली म्हणून चिमूर, भद्रावती, वरोरा, सावली, मूल, ई तालुक्याच्या अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बल्लारपूर सह राजुरा,कोरपना, सिंदेवाही शाखेच्या नवनियुक्त अध्यक्षांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा-बल्लारपूर च्या तालुकाध्यक्ष पदी मनोहर दोतपल्ली यांची निवड करण्यात आली आहे याप्रसंगी संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे, उपाध्यक्ष प्रदीप रामटेके, जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे, जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, मुन्ना खेडकर, विशाल डुंबेरे, दिपक भगत, धनंजय पांढरे, वसंत मुन, देवानंद देशभ्रतार, श्रीनिवास सिंगाराव, सर्व सदस्यांनी नवनियुक्त बल्लारपूर तालुकाध्यक्ष मनोहर दोतपल्ली यांचे अभिनंदन केले. या सभेत सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी, सचिव आवर्जून उपस्थित होते.