११ डिसेंबरला जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

75

११ डिसेंबरला जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

११ डिसेंबरला जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
११ डिसेंबरला जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा, दिनांक ०१/१२/२१ उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय आणि हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू व समुद्रपूर येथील तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्याकरीता संबधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती कडे अर्ज करुन राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सामजस्याने व तडजोडीने प्रकरणे मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकअदालती मध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय.ॲक्ट प्रकरणे, भु संपादन प्रकरणे, कौटूंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी सबंधित प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद,बँक संबधित वाद प्रकरणाचा समावेश असणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबीत तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी आपली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत ठेवून मध्ये आपसी जडजोडीने निकाली काढावीत असे विधी सेवा प्राधिकरणने कळविले आहे.