आलापल्लत कासव तस्कर प्रकरणी चौघांना अटक 5 कासवांसह 22 खेकडे जप्त

*अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335*
आलापल्ली वनविभागा तील आलापल्ली परिक्षेत्रा मध्ये गडचिरोली जिल्ह्या चे वनसंरक्षक किशोर मानकर, उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी हे रात्र गस्त करीत असतांना त्यांना कक्ष क्रमांक 81मध्ये दोन दुचाकी वर चार इसम संशयास्पद हालचाली करतांना आढळले गस्ती पथकाने त्यांची तपासणी केली असता. त्यांच्या कडे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसुची 1 मधील भाग 2 मध्ये सुचीबंध्द असलेले शिकार व विनापरवानगी वाहतुकीस प्रतीबंधीत असलेले 5 कासव प्रजातीचे वन्यजीव आढळले. त्यासोबत 22 खेकडे, 2दुचाकी, 3 टार्च व मासे पकडण्याची जाळी इत्यादी साहित्य मिळाले.
आरोपीत इसम रामपद लक्ष्मण हलदर,गोपाल ललीत बाईन,फटीक देवेंद्र मंडल,नित्यानंद मनोहर हलदर सर्व राहणार हरीनगर मुलचेरा यांच्या वर भारतीय वन्यजीव संरक्षण अधीनियम 1972 चे कलम 9,39,48,49,49अ,व जैवविविधता अधीनियम 2002 मधील कलम 56 नुसार वनगुन्हा क्रमांक 08104/08 नोंदवीन्यात आला आहे. आरोपीत इसम यांना माननीय न्यायालय अहेरी यांच्या समक्ष हजर केले असता आरोपीत इसम यांना कंडिशनल बेस वर बेल देण्यात आली. सदर प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश शंकर देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली हे करीत आहे. कासव हे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी नंतर त्याच्या नैसर्गिक अधीवासात सोडण्यात येणार आहे.
सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, क्षेत्रसहाय्यक अनिल झाडे, प्रभाकर अनकरी,एम.आर.भोयर,प्रकाश राजुरकर,नियत वनरक्षक डि.एस.चिव्हाणे, बाळु मडावी,जामभुळे, मातने, कचलामी, राठोड, महेश खोब्रागडे व वाहन चालक विक्की कोडापे, वर्मा हे सहभागी होते.
आलापल्ली चे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया यांनी कासव हे वन्यजीव असुन ते वनकायद्यातील अनुसुची मध्ये शेड्युल 1 मध्ये सुचीबद्ध असुन त्यांची शिकार अथवा पकडल्यास वनकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो ज्यात 7 वर्षा पर्यंत ची शिक्षा व एक लाखा पर्यंत दंड होतो. करीता कासव ची शिकार करू नका असे आवाहन केले आहे.