पोलिस स्टेशन गोंडपिपरी आणि पोलिस स्टेशन धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान शिबीर
रोग निदान,औषधी वितरण व अवयव विषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

रोग निदान,औषधी वितरण व अवयव विषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दिनांक ३० नोव्हेंबर रोजी पोलिस स्टेशन गोंडपिपरी आणि पोलिस स्टेशन धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान,औषधी वितरण व अवयव विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आली होती.शिबिराचा लाभ घेण्यासाठी गावागावांतील लोकांना गोंडपिपरी चे ठाणेदार जीवन राजगुरू आणि धाबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुशील धोपटे यांनी आवाहन केले होते. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख,अतीरिक्त उपविभागीय पोलिस अधिकारी (मुल) राजा पवार,तहसीलदार के. डी.मेश्राम उपस्थित होते.
सुदृढ आरोग्य हिच खरी धनसंपदा असे म्हटल्या जाते.याचाच परिचय देत प्रथमच पोलीस प्रशासनाकडून तालुक्यात आरोग्य विषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले.स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे आज काळाच्या पडद्याआड लपले.काही पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांच्या चुकीच्या धोरनांनमुळे जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडाल्याचे चित्र होते.परंतु पोलीस प्रशासन जनतेच्या हितासाठी व सेवेसाठी काल पण होती आणि आज पण आहे हे या सामाजिक कार्यातून दाखवून दिले.रुग्णांनी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने शिबिराचा लाभ घेतला.पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शिबिराच्या मंचावरुन बोलतांना म्हणाले की, तालुक्यातील गरजु रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने मोफत सेवा देण्याचे महान कार्य शिबिराच्या माध्यमातून पोलीस प्रशासन करत असुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले व तपासणीसाठी उपस्थित रुग्णांना शुभेच्छा दिल्या.