वंचित बहुजन आघाडी माणगांव तर्फे पनवेलचा गावागुंड जगदीश गायकवाड याच्यावरती त्वरित कारवाई करावी याकरिता माणगांव पोलीस ठाण्यात निवेदन
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-जगदीश गायकवाड या गुंड व समाज विघातक प्रवूतिच्या व अनेक गुणहेगरी केसेस असलेल्या अतिशय जहरी आणि नीच पातळीवर जाऊन आंबेडकर कुटुंब बाबत गरलं ओकली आहे. हा आंबेडकरी कुटूंबावरच नव्हे तर आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे कट कारस्थान दिसत आहे. या इशाऱ्यावर समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा पर्यन्त दिसत आहे. या अनुषंगाणे वंचित बहुजन आघाडी तर्फे माणगांव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
जगदीश गायकवाड याच्या अवैध धंद्या बद्दल अगोदर अनेक तक्रारी दाखल आहेत या सर्व गोष्टीची चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्र सरकारने ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरु केली पाहिजे जगदीश गायकवाड यांना अभय देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने करू नये.
लोकांच्या भावना प्रक्षुब्ध आहेत कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहिले असे वंचित बहुजन आघाडी माणगांव तर्फे पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे यावेळी माणगांव चे कार्यकर्ते शरद का. पवार माजी अध्यक्ष, सिद्धार्थ सोनावणे, स्वप्ना अमोल कांबळे, पूजा शिर्के, किरण मोरे, प्रवीण जाधव, रमेश घोगरे, प्रदीप गायकवाड, नवनीत साळवी आणि कमलाकर गंगावणे याच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले.