मुंबई गोवा महामार्गांवर होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण……

77
मुंबई गोवा महामार्गांवर होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण......

मुंबई गोवा महामार्गांवर होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण……

मुंबई गोवा महामार्गांवर होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण......

✍️विवेक काटोलकर ✍️
माणगांव प्रतिनिधी
📞7798923192📞

माणगांव :-मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव शहरातील बाजारपेठेत नेहमीच वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे माणगावकर हैराण झाले आहेत. या महामार्गाचे माणगाव शहरातील रुंदीकरण झालेले नाही. या शहरात सुट्टीच्या दिवसात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुंबई गोवा तसेच दिघी बंदर, श्रीवर्धन आणि पूणे येथे ये जा करण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. वाहनाची लाईन पाहायला गेल्यास जवळपास तीन ते चार किमी तर काही वेळा तासन तास वाहने उभी राहिलेली पहावयास मिळतात.

या महामार्गाचे काम गेली १७ वर्षे रखडलेल्या अवस्थेत आहे. तसेच बायपासचे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सातत्याने माणगाव शहरातील वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. याचा नाहक त्रास नागरीकांना होत आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या वाहतूक कोंडीचा त्रास खुद्द मंत्री, खासदार आणि आमदार यांना देखील सहन करावा लागला आहे. या वाहतूक कोंडी बाबत अनेक वर्षे आवाज उठविला गेला आहे परंतु ठोस निर्णय आणि कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत.