अलिबाग बीच वरकिरकोळ वादातून थेट हत्या, आरोपींना अटक

95
अलिबाग बीच वरकिरकोळ वादातून थेट हत्या, आरोपींना अटक

अलिबाग बीच वरकिरकोळ वादातून थेट हत्या,
आरोपींना अटक

अलिबाग बीच वरकिरकोळ वादातून थेट हत्या, आरोपींना अटक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:शिवीगाळ का करतो, म्हणून विचारणा केली असता अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या मारामारीत मितेश जनार्दन पाटील (गडब, पेण) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रथमेश राजेश पाटील याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी ओमकार सुरेश भूकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राज रमन जयगडकर आणि प्रमोद किशन साठविलकर, या पाचही आरोपींना तासाभरात ताब्यात घेतले. या मारामारीत प्रथमेश पाटील आणि ओमकार भूकवार हे जखमी झाले आहेत.

शनिवारी (30 नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मितेश पाटील व त्याचा मित्र प्रथमेश पाटील अलिबाग बीचवर मेरीटाईम बोर्डाच्या ऑफिसशेजारी कट्ट्यावर बीअर घेऊन बसले होते. त्यावेळी तेथे ओमकार भूकवार, विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर आणि प्रमोद साठविलकर हे पाच जण दारू पीत होते. मितेश आणि प्रथमेश पाटील यांनी बिर्याणी खाऊन आणि बीअर प्यायल्यानंतर प्रथमेशने रिकामी बाटली कट्ट्यावरून पाठीमागे दगडावर सोडली. नेमकी ती बाटली फुटली आणि आवाज झाला. त्यावेळी पाच जणांपैकी ओमकार भूकवार याने मितेश आणि प्रथमेश पाटील यांना शिवगाळ केली आणि बाटली का फोडलीस, असे विचारले. त्यावर शिवी का देतोस, असे मितेशने विचारले.
त्यावरून संतप्त झालेल्या ओमकारने मितेशला हाताबुक्क्याने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी प्रथमेश पाटील गेला असता विशाल वंटे, प्रथमेश घोडेकर, राज जयगडकर, प्रमोद साठविलकर यांनी बीअरच्या बाटल्यांनी दोघांना मारहाण केली. त्यानंतर ओमकारने मितेशला मागून घट्ट मिठी मारून पकडून ठेवले आणि चौघांपैकी एकाने मितेशच्या डाव्या पोटावर आणि मानेवर वार केले आणि पळून गेले.

यात मितेश रक्तस्त्राव होऊन कोसळला. त्याला प्रथमेशने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा मितेशचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी पाचही आरोपींना एका तासात जेरबंद केले.