हिंगणघाट कार्यसम्राट आमदार समीर कुणावार हस्ते सिमेंट रोडचे भूमिपूजन.

मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- महात्मा फुले वार्ड येथे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते मज्जीद ते शिव मंदिर रोड पर्यंतचे सिमेंट रोडचे भूमिपूजन करण्यात आले. सदर रोड फुले वार्डाच्या हीताकरिता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीचे व हिताचे होण्याकरिता कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी सदर रोडचे भूमिपूजन केले हा रोड 6 महिन्याच्या कालावधीच्या आत लवकरात लवकर करण्याचे आदेश संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. सदर रोडचे भूमिपूजन करतेवेळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष माननीय प्रेम बाबू बसंतानी, नगरपरिषद बांधकाम सभापती सौ. शितल अमोल खंडार, नगरसेविका सौ. शुभांगीताई सुनील डोंगरे, नगरसेवक अमन काळे, अशोकराव रामटेके, समाजसेवक सुनीलभाऊ डोंगरे, समाजसेवक अमोल खंदार बांधकाम अधिकारी पोफळे, भाजपा तालुकाध्यक्ष आकाशभाऊ पोहाणे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष संजयजी डेहने, इत्यादी कार्यकर्ते व वार्डातील तसेच शहरातील असंख्य जनसमुदाय सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here