जन्मदात्या आईने स्वतःच्या पोटच्या जुळ्या दोन मुलींपैकी एका दोन महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या.

गुणवंत कांबळे प्रतिनिधी

वसई :- सरत्या वर्षाला निरोप आणि नाव वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला असताना वसईत मात्र हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच स्वतःच्या पोटच्या जुळ्या दोन मुलींपैकी एका दोन महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून संपविल्याचा प्रकार वसईत समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

वसईतल्या पाचूबंदर परिसरात हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी क्रूरकर्मा मुलीच्या आईला अटक केली आहे. सदर घटनेने वसई परिसरात आरोपी महिलेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जन्म देणाऱ्या आईनेच 2 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केली आहे. आरोपी महिला वसई पाचूबंदर इथे आपल्या कुटुंबासोबत राहते. तिचा पती बोटीवर मासेमारी करतो. महिलेला दोन महिन्यांपूर्वी 2 जुळ्या मुली झाल्या होत्या. इतकंच नाहीतर तिच्या जावेलासुद्धा दोन मुलीचं आहेत. घरात मुलीच झाल्याने हे कुटुंब अश्वस्थ होते. तसेच दोन जुळ्या मुली असल्याने आरोपी महिलेला दोघींना सांभाळणे ही कठीण होत होते.

बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन आरोपी महिलेने आपल्या स्वता:च्या मुलीला उचलून छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केली आहे. घरातील व्यक्तीच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुलीची चौकशी केली असता प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here