वर्षांचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा , फोटोमागची कहाणी वाचून काळजाचा ठोका चुकेल…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वसईच्या रेंज नाक्याजवळ 18 वर्षाच्या तरुणीचा सकाळी 10 च्या सुमारास काळजाला सुन्न करणारा अपघात.

हिरामण गोरेगांवकर

मुंबई:- वसईत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. एका 18 वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने रस्ता क्रॉस करणाऱ्या मुलीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघाता मध्ये या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत असल्याची माहिती देण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार अपघात झाल्यानंतर हि तरुणी घटना स्थळी गंभीर जखमी अवस्थेत अपघातस्थळी पडली होती . पण जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर तिला मयत घोषित केल . आल्फीया सय्यद असं या अपघातात मयत तरुणीचं नाव आहे. हि तरुणी बारावीच शिक्षण करून घराच्या मदती साठी जॉब हि करायची आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10 च्या सुमारास वसईच्या रेंज नाक्याजवळ कामावर जाताना रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला. रस्ता ओलांडतना समोरून येणाऱ्या भरधाव मोटारसायकल स्वाराने तिला जोरदार धडक दिली त्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोटारसायकल चा तपास करुन मोटारसायकल तसेच आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे. मयत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आणि अधिक तपास सुरु केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे . खरंतर तरुणीच्या अशा अकाली जाण्याने तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . तर तिच्या मित्रपरिवारातही अशा अकाली जाण्याने शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here