सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून लावलेली झाडे गेली चोरीला.

प्रशांत जगताप/मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तसेच वाढते जागतिक तापमान कमी करण्यासाठी भारतच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वृक्ष लागवडीचा नारा दिला जात अाहे. मात्र, कागदी घाेडे नाचवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने वर्धा जिल्हातील हिंगणघाट, समुद्रपुर तालूक्यातील हजारो झाडे आज दिसेनाशी झाली आहे. झाडे लावून ती जगवण्याची, त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या वर्धा जिल्हातील हिंगणघाट आणी समुद्रपुर येथील सामाजिक वनीकरण विभागाने कागदोपत्री हजारो झाडे लावल्याचे वडनेर, आजनसरा, गिरड, वाघोली ग्रामस्थांनी बोलुन दाखवले. आणी जी लावण्यात आली, त्यातील जवळपास झाडे देखभाली अभावी जागीच जाळून गेली आहेत. रोप तयार करुन ती फुलवण्या करिता महाराष्ट्र शासनाचे करोड़ो रुपये खर्च झाले. मात्र केवळ देखभाली अभावी हजाराे झाडे मेली असतील तर त्यावरील झालेल्या खर्चास जबाबदार कोण? अाणि  आणी अनेक गावात कागदोपत्री झाडे लावली अस दाखवून, ती झाडे लावलीच गेली नाही आणी देखभालीसाठी उचलला जाणारा निधी मुरताेय कुठे, हे न उलगडणारे कोडे आहे.

वृक्षारोपणासाठी आवश्यक वृक्षांची राेपे तयार करण्याचे काम सामाजिक वनीकरण विभाग करतो. यासाठी पाण्याची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता यानुसार रोपवाटिका तयार केल्या जातात. वर्धा जिल्हातील हिंगणघाट, समुद्रपुर, वडनेर, गिरड, वाघोली, आजनसरा क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागामार्फत तालुक्यातील वृक्षारोपण मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे जनतेमध्ये चर्चा आहे. सद्यःस्थितीत लावलेली अनेक वृक्ष हे पुर्णपणे मरण पावली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे जागेवरच जळून गेली आहेत. वृक्षाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कडे का दुर्लक्ष केले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सामाजिक वनीकरण विभागाने ज्या ठिकाणी वृक्ष, राेपांची लागवड केली, त्या वृक्षांची देखभाल करून त्यांना मोठे करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. झाडांना पाणी देण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे, पाणी देण्यासाठी, देखरेखीसाठी मजुरांची रोजंदारीवर नेमणूक करणे आदी कामे सामाजिक वनीकरण विभाग करतो. मात्र दुर्दैवाने तालुक्यातील बहुतांश ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेली झाडे आज घडीला पाहायला मिळत नाहीत. हिंगणघाट आणी समुद्रपुर तालूक्यातील शिवारातील पडीत जमिनीत आणी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लागवड करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी खुप कमी झाड पाहायला मिळत आहे.

विदर्भातील सर्वात जास्त झाडे मिळाली होती वर्धा जिल्हाला.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत नागपूर विभागात सर्वाधिक झाडे वर्धा जिल्ह्यात तर सर्वांत कमी झाडे गोंदिया जिल्ह्यात लावली जाणार होती. सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेकडील रस्त्यांवर ठराविक लांबीत आंबा, चिंच, लिंब, वड, पिंपळ इत्यादी प्रजातींच्या झाडांपासून वने तयार करायची होती. त्यामूळे वर्धा जिल्हातील हिंगणघाट आणी समुद्रपुर तालूक्यात लाखो झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत दिलेल्या उद्दिष्टाला आज कुठे तरी भष्ट्राचाराचे गहन लागल्याचे दिसून येत आहे. झाडांची लागवड केली, असे अहवालात दाखवून, उद्दिष्ट हिंगणघाट आणी समुद्रपुर तालूक्याने पूर्ण केल्याचे सदरील अहवालावरून स्पष्ट होते. तथापि, प्रत्यक्षातील कामगिरीवर  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

किती झाडे जगली?
२०१९ या कालावधीत वन विभागाने ३३ कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली होती. तत्कालीन वनमंत्र्यांनी या योजनेचा गाजावाजाही केला. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र लावलेल्या झाडांपैकी  किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय ठरावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here