ताकद महाराष्ट्र पोलिसांची.
maharashtra police information
ताकद महाराष्ट्र पोलिसांची.

सिद्धांत
२ जानेवारी २०२१: महाराष्ट्र राज्य भारत देशातील एक महत्त्वाचे आर्थिक,राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, तंत्रज्ञान क्षेत्रातले केंद्र आहे. महाराष्ट्रातील मुंबई, शहरांमध्ये देशातीलच नव्हेच जगभरातील कंपन्या, बँक, उद्योग यांची मुख्यालये, कारखाने आहेत. साडे बारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हानात्मक काम महाराष्ट्र पोलीस सक्षमपणे करत असते. दहशतवादी हल्ले, दंगली, आंदोलने, नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रसंगी स्वतःच्या जीवाची बाजी लावून महाराष्ट्र पोलीस नागरिकांचे संरक्षण करत असते.

सध्याच्या घडीला १.९५ लाख मनुष्यबळ असलेल्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये जवळपास १५,००० महिला पोलिसांचादेखील समावेश आहे. देशातील सर्वात मोठ्या पोलिसदलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या अखत्यारीत १३ आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलिसांचे विभाग आहेत.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य. सज्जनांचे रक्षण करण्यास दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास महाराष्ट्र पोलीस कटीबद्ध आहे, असा या ब्रिदवाक्याचा अर्थ आहे. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दररोज राज्यभरात ५८०० पेक्षा जास्त तक्रारींचे निवारण केले जाते. निरनिराळे गुन्हे, सामाजिक घटक आणि नागरिकांच्या समस्यांवर नियत्रंण ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वेगवेगळ्या विशेष पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष पथके.
राज्य गुप्तचर विभाग: भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना १९०५ साली फ्रेझर आयोगाच्या शिफाशीवरून राज्य गुप्तचर विभागाची स्थापना करण्यात आली होती. राजकीय, संरक्षणविषयक, सांप्रदायिक, कामगारविषयक, सुरक्षेला असलेले धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक यांविषयीची माहिती गोळा करणे, तिचा तुलनात्मक अभ्यास, विश्लेषण आणि प्रसार यांच्याशी निगडित बाबी हाताळण्याचे काम गुप्तचर विभागाकडून केले जाते.
वेबसाइट लिंक: https://www.mahapolice.gov.in/state-intelligence-department/

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस): आयबी, रॉ सारख्या केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधून राज्यातील दहशतवादी गट, माफिया तसेच अन्य संघटित गुन्हेगारी यंत्रणांच्या राष्ट्रदोही कारवायांबद्दल माहिती गोळा करण्याचे व त्यावर कारवाईचे करण्याचे काम हा विभाग करत असतो. त्याचबरोबर बनावट चलन आणि अमली पदार्थांच्या तस्किरीच्या घटना उघडकीस आणायचे काम देखील एटीएस पथकाद्वारे केले जाते.
वेबसाइट लिंक: https://www.mahapolice.gov.in/anti-terrorism-squad/

महामार्ग वाहतूक पोलीस: महाराष्ट्रातील रस्ते, महामार्ग राज्याच्या प्रगतीचे मार्ग आहेत. ह्या रस्त्यांवरील रहदरीचे नियंत्रण करण्याचे आणि वाहतुकी दरम्यान संकटकाळी जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे काम वाहतूक पोलिसांतर्फे केले जाते.
वेबसाइट लिंक: https://highwaypolice.maharashtra.gov.in/en/

गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी): फायरआर्म, स्फोटके, मर्डर, दरोडे या संदर्भातील गंभीर गुन्हयांमधील गुंतागुंतीचे तपासकार्य करण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाकडून केले जाते. या विभागाचे मुख्यालय पुणे इथे आहे.
वेबसाइट लिंक: https://mahacid.gov.in/

राज्य राखीव पोलीस दल (SRPF): सुमारे १८,००० मनुष्यबळ असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील तसेच राज्याबाहेरील नक्षलविरोधी कारवायांमध्ये सहभाग असतो. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे मोठे योगदान असते.
वेबसाइट लिंक: http://www.maharashtrasrpf.gov.in/

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी): महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय कारभार भ्रष्टाचारमुक्त राखण्याचे आणि उघडकीस आलेल्या भ्रष्टाचारच्या प्रकरणांवर कारवाई करण्याचे काम महाराष्ट्र पोलीस दलाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे केले जाते.
वेबसाइट लिंक: http://acbmaharashtra.gov.in/

देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे.

शिराळा पोलीस ठाणे

गृह मंत्रालयाकडून देशभरातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनच्या यादींमध्ये महाराष्ट्राच्या धुळे, चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली आणि सांगली जिह्यातील शिराळा पोलीस ठाण्यांना नामांकन मिळाले होते. यापैकी शिराळा पोलीस ठाण्याची देशातील सर्वोत्तम पोलीस ठाण्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर निवड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here