गोंडपिपरीतील कराटे पटुंचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश

राजेंद्र झाडे
प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-राज्यस्तरीय ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021 वणी जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 20 डिसेंबर 2019 रोज रविवार ला आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत गोंडपिपरी येथील ट्रॅडिशनल शितो-र्हू कराटे तथा कुबुडो ऑर्गनायझेशन इंडिया तर्फे सेन्साई कुंदन पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली भाग घेतला होता. त्यात कुमारी आरोही अवथरे हिने नऊ वर्ष वयोगटात गोल्ड मेडल,कुमारी स्वरा गणेश गेडाम आठ वर्षे वयोगटात ब्रांच, गुंजन गुडपल्ले नऊ वर्षे वयोगटात ब्रांच,अगस्त अलोने आठ वर्षे वयोगटात ब्रांच,ओम चीलनकर दहा वर्षे वयोगटात ब्रांच,तर यथार्थ अवथरे या लहानग्या मुलाने सुद्धा सहा वर्ष वयोगटातील ब्रांच पदक पटकावून यश संपादन केले आहे.
विजेत्या टीमचे पालकांनी मिठाई,जलेबी व फुलांचा वर्षाव करून जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली विजेत्या टीमचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे श्री रमेश पेंदोर सर यांनी सर्व विजेत्या टीमचे कौतुक केले व बिकानेर स्वीट मार्ट मध्ये आमंत्रित केले मुलांनी येथेच्छ स्वाद घेत मिठाईचा मनमुराद आस्वाद घेतला.मुलांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक सेन्साई श्री कुंदन पेंदोर व आई-वडिलांना दिले.