आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये घातला गोंधळ

आमदार कारेमोरेंचा पोलीस स्टेशनमध्ये वाद! व्यापाऱ्याचे 50 लाख पळविले? पोलीस म्हणतात, शासकीय कामात अडथळा?

आमदार कारेमोरेंचा पोलीस स्टेशनमध्ये वाद! व्यापाऱ्याचे 50 लाख पळविले? पोलीस म्हणतात, शासकीय कामात अडथळा?
आमदार कारेमोरेंचा पोलीस स्टेशनमध्ये वाद! व्यापाऱ्याचे 50 लाख पळविले? पोलीस म्हणतात, शासकीय कामात अडथळा?

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442

नागपुर/भंडारा :- व्यापारी मित्राला पोलिसांनी बेदम मारहाण केली म्हणून आमदार राजू कारेमोरेंनी मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोंधळ घातल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोख रक्कम पळविल्याची आमदार मित्रांनी पोलिसात तक्रार केली. तर पोलिसांनी देखील आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा करत असल्याची तक्रार केल्याने आमदार आणि पुलिस आमने सामने आले आहे.

भंडारा जिल्हातील तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री दहा वाजता तुमसरकडे जात होते. सोबत त्यांनी आमदारांच्या घरून त्यांनी 50 लाख रुपयांची रोकड घेतली होती. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी कार अडविली. वळण असताना गाडी चालकांना इंडिकेटर का दिले नाही म्हणून दुचाकी वाहनाने पोलिसांनी कारचा पाठलाग केला. गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पडविली. अशी तक्रार यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे. तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला.

दुसरीकडे आमदार राजू कारेमोरे यांनी खाकी वर्दी घालून दबंगगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. आता स्वतः गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी करीत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला. फिर्यादींना केलेली अमानुष मारहाण पाहता खाकी वर्दीतील गुंड प्रवृत्ती समोर आली आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई होणार काय याकडं पाहावं लागेलं.